नाना पाटेकर एक दमदार अभिनेते, चित्रपट निर्माते होते, ज्यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत काम केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान आणि सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पाटेकर यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार, दोन महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास मराठी थिएटरपासून केला होता त्यानंतर ते चित्रपटात आले
नाना पाटेकर यांना चित्रपटात पहिली संधी प्रसिद्ध दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी दिली. त्यांनी १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'गमन' या हिंदी चित्रपटातून नाना पाटेकरांना रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची पहिली संधी दिली होती. नाना यांनी चित्रपटात काम करावे, यासाठी दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांनी त्यांना सल्ला दिला होता.
नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी मुरुड-जंजीरा येथे झाला. त्यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर आहे. त्यांनी मुंबईतील 'सर जे. जे. इन्स्टीट्यूट ऑफ ॲप्लाईड आर्ट'मधून शिक्षण घेतले होते. त्यानंतर एका जाहिरात एजन्सीमध्ये काम केले.
शिक्षण घेताना ते थिएटरशी जोडले गेले अनेक नाटकांतून काम केलं. मराठी नाटकांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय साकारला. त्यामुळेच पुढे त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली
स्मिता पाटील आणि नाना पाटेकर आधीपासून एकमेकांना ओळखत होते. स्मिता पाटील यांनीच नाना पाटेकरांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आग्रह धरला होता. असं म्हटलं जातं की, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांनी नाना पाटेकरांना दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्याकडे नेले. सुरुवातीला त्यांना एका चित्रपटात नकारात्मक छटा असलेली छोटी भूमिका विचारण्यात आली होती. ज्याबद्दल नानांनी नाराजीही व्यक्त केली होती.
त्यांनी १९७८ मध्ये मुजफ्फर अली यांचा चित्रपट 'गमन'मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. 'गमन' (१९७८) हा नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये त्यांनी वासू नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरची छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी काही मराठी चित्रपट आणि काही छोट्य़ा भूमिका साकारल्या.
त्यानंतर १९८६ मध्ये आलेल्या 'अंकुश चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता मिळवून दिली, जो त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला.
१९८९ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'परिंदा'मध्ये एक गँगस्टर (अण्णा शेट्टी) ची भूमिका साकारल्यानंतर त्यांना मोठी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला
अग्निसाक्षी, तिवीर, तिरंगा, परिंदा, खामोशी, वेलकम, सलाम बॉम्बे, परिंदा, प्रहार-द फायनल ॲटेक, अंगार, राजू बन गया जेंटलमन, तिरंगा, खामोशी-द म्युझिकल, अब तक छप्पन, टॅक्सी नंबर ९२११, नटसम्राट, शक्ती द पॉवर यासारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी कसदार अभिनय साकारला.
अभिनयासाठी तीन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, चार फिल्मफेयर पुरस्कार, दोन महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेयर पुरस्कार मराठी सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट आणि कलेतील योगदानासाठी चित्रपट आणि कलेतील योगदानासाठी त्यांना २०१३ मध्ये पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले होते