लॉरेन्स बिश्नोई file photo
मनोरंजन

Lawrence Bishnoi Web Series : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर येतेय वेबसीरीज

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर येतेय वेबसीरीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - सध्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा वाद सुरु अशताना आणकी एक माहिती समोर येत आहे. सलमान खानचे निकटवर्तीय बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर आता आणखी एक त्याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जीवनावर एक वेबसीरीज येणार असल्याची माहिती समोर आली आहे. निर्मात्यांनी नुकतीच त्याची घोषणा केली आहे. ही सीरीज अ‍ॅक्शन सीन्सवर असेल.

रिपोर्टनुसार, जानी फायरफॉक्स फिल्म प्रोडक्शन हाऊस गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर सीरीज आणणार आहे. असेही म्हटले जात आहे की, मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. वेब सीरीजमध्ये लॉरेन्स बिश्‍नोईशी संबंधित खरी कहाणी दाखवण्यात येईल. प्रोडक्‍शन हाऊसने ही माहिती दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT