मुनव्वर फारुकी बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे  instagram
मनोरंजन

Lawrence Bishnoi-Munawar Faruqui |लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - बिग बॉस १७ चा किताब जिंकल्यानंतर मुनव्वर फारूकीचे फॅन फॉलोईंग आणखी वाढले आहे. मुंबईमध्ये बाबा सिद्दीकींची हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली. आता रिपोर्टनुसार, बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान शिवाय कॉमेडियन मुनव्वर फारूकी देखील असल्याची माहिती समोर आली आहे. (Lawrence Bishnoi Munawar Faruqui) मागील महिन्यात दिल्लीत त्याला निशाण्यावर धरण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्याची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

एक पोलिस अधिकारीने माहिती दिली की, बिश्नोई गँगपासून कॉमेडियन मुनव्वरला धोका होऊ शकतो. परंतु, त्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बिश्नोई गँगच्या काही सदस्यांनी मागील महिन्यात दिल्लीत त्यांच्या हत्येचा तथाकथित प्रयत्न केला होता आणि मुनव्वरचा पाठलाग केला होता. गुप्तचर यंत्रणेला याची माहिती वेळीच मिळाली आणि वेळीच कारवाई करून मुनव्वरला घटनास्थळावरून हटवून हल्ला हाणून पाडण्यात आला.

फारूकी आपल्या कॉमेडी शोमध्ये ईश्वरावर कॉमेंट केल्यानंतर वादग्रस्त ठरला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT