मिहिरची तुलना श्रीरामाशी pudhari
मनोरंजन

Hindi Serial Update: मेकर्सनी मिहिरची तुलना केली श्रीरामाशी; क्यो की सास भी.. वर चांगलेच भडकले प्रेक्षक

याला कारण आहे या मालिकेत झालेली मिहिरची एंट्री

अमृता चौगुले

एकता कपूरचा लाडका शो 'क्यों की सास भी कभी बहू थी' ही मालिका सध्या ट्रोलरच्या निशाण्यावर आली आहे. याला कारण आहे या मालिकेत झालेली मिहिरची एंट्री.... टीआरपीमध्ये कायम दुसऱ्या किंवा तिसऱ्या असलेली ही मालिका प्रेक्षकांना भलतीच आवडली आहे.

लेटेस्ट एपिसोड रिलीज झाल्यानंतर मात्र या मालिकेला प्रेक्षक चांगलेच ट्रोल करत आहेत. (Latest Entertainment News)

काय होते त्या एपिसोडमध्ये?

अलीकडेच रिलीज झालेल्या दसरा थीमवरील एपिसोडमध्ये अमर उपाध्याय साकारत असलेल्या मिहिर आणि प्रभू श्रीराम यांच्या व्यक्तिरेखेत समानता दाखवली गेली आहे. प्रेक्षकांना ही तुलना अजिबात आवडलेली दिसत नाही. लोकांनी हा देवाचा अपमान असल्याचे म्हणले आहे.

या एपिसोडमध्ये मिहिर आपली पत्नी तुलसीशी झालेल्या वादानंतर दसऱ्यातील हवनसाठी घरी येतो. त्याची घरात एंट्री होते तशी बॅकग्राऊंडला 'राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम' हे संगीत वाजू लागते. तसेच तुलसी आणि मिहिरला देखील फ्रेममध्ये दाखवले जाते. या तुलनेवर लोक चांगलेच भडकले आहेत.

एका पोस्टच्या कमेंटमध्ये लोक म्हणतात, 'आतापर्यंत लिहिलेल्या सगळ्यात टॉक्सिक व्यक्तिरेखांपैकी मिहिर एक आहे. त्याला अशाप्रकारे महान बनवणे आणि श्रीराम यांच्याशी जोडणे हा भारतीय मूल्यांचा अपमान आहे.’ एकजण म्हणतो, ‘ मला खूप वाईट वाटते जेव्हा मिहिर- तुलसीला राम सीतेची जोडी म्हणले जाते. खरे तर बाहेर अफेअर असलेल्या व्यक्तीची तुलना श्रीरामांशी करणेही चुकीचे आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT