टिकटॉकस्टार कुबरा आयकूटने जीवन संपवले  instagram
मनोरंजन

Kubra Aykut | स्वतःशी लग्न करणाऱ्या कुबराने संपवले जीवन

पुढारी वृत्तसेवा

इस्तंबूल : तुर्कीतील टिकटॉकस्टार कुबरा आयकूट (वय २६) हिने २०२३ मध्ये योग्य वर न मिळाल्याचे कारण देऊन स्वतःशीच लग्न केले होते. अशा स्वरूपाचे हे पहिलेच लग्न असल्याने त्याची जगभरात चर्चाही झाली. कुबरा आपल्या रिल्समुळेही जगभर प्रसिद्ध होती.

सुल्तानबेलीतील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तिने उडी मारली. तिच्या मृतदेहासोबत एक चिठ्ठी आढळली असून, मी स्वतःशी लग्न करून स्वतःवर प्रेम करण्याचा प्रयत्न केला खरा, पण मला त्यात यश आले नाही, अशी वेदना या चिठ्ठीत तिने लिहिली आहे. कुबरा आयकुटवर तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT