गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्यातील मतभेद संपुष्टात Krushna Abhishek- Govinda
मनोरंजन

Krushna Abhishek : गोविंदा-कृष्णा अभिषेक यांच्यातील मतभेद संपुष्टात

स्वालिया न. शिकलगार

ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड अभिनेता गोविंदा (Govinda) चा भाचा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह (Kashmera Shah) सोबतचे नातेसंबंध ताणले गेले होते. दोघांच्या कुटुंबादरम्यान मतभेद असल्याच्या गोष्टी २०१६ मध्ये समोर आल्या होत्या. तेव्हा याबाबत गोविंदा म्हणाला होता की, त्याला कृष्णाविषयी कुठलीच तक्रार नाही. अर्थात, त्याआधी कृष्णाने एका पॉडकास्ट शोमध्ये आपला मामा गोविंदाची जाहीर माफीही मागितली होती. यानंतर असे दिसते, की दोघांमधली दरी आता बुजली आहे. (Krushna Abhishek)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, गोविंदाचा भाचा विनय आनंद याने (Vinay Anand) मामा-भाच्याच्या एकत्र येण्यातून घडणाऱ्या विविध कौटुंबिक गोष्टी आणि इतर मुद्द्यांवरही प्रकाश टाकला.

विनय आनंद हे भोजपुरी सिनेमाचे (Bhojpuri Cinema) लोकप्रिय अभिनेते आहेत. आता विनय हे 'मकान' (Makaan) या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा बॉलीवुडमध्ये कमबॅक करणार आहेत. या वादाबाबत विनय यांनी माध्यमांना अनेकदा सांगितले होते, की रियल लाईफ आणि रील लाईफ या दोन वेगळ्या गोष्टी असतात. विनय आनंद यांची इच्छा होती, कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील मतभेद दूर झाले पाहिजेत.

विनय आपला भाऊ कृष्णा यांच्यामुळे थोडा निराश वाटतो आहे. विनय यांची इच्छा होती की त्यांच्या कुटुंबातील सगळे मतभेद दूर व्हावेत. सगळे हसत खेळत एकमेकांसोबत रहावेत. या वादासंदर्भानेच विनयने सोशल मीडियावर घोषणा केली की आता कृष्णा आणि गोविंदा यांच्यात कसलाही वाद नाही.

गोविंदा म्हणाला की, आता कृष्णाला माफी मागायची गरज नाही. तो पूर्वी जसा मोकळेपणाने बोलायचा, तसेच आताही बोलावे, वागावे. हा घरगुती विषय होता आणि आता तो संपला आहे. विनय यांनी यानंतर लिहिले, की कृष्णा माझा सर्वात आवडता छोटा भाऊ आहे आणि गोविंदा माझे मामा आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT