मंत्री कोंडा सुरेखा यांनी लामंथाची माफी मागितली  instagram
मनोरंजन

मंत्री कोंडा सुरेखा यांनी Samantha Prabhu ची मागितली माफी, नेमकं प्रकरण काय आहे?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - तेलंगानाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी सामंथा रुथ प्रभूची माफी मागितली आहे. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने सुरेखा यांनी माफी मागितली आहे. कोंडा सुरेखा यांनी सामंथा - नागा चैतन्यच्या घटस्फोटाचे कारण बीआरएस (भारत रक्षा समिती) नेते केटी रामा राव हे असल्याचे सांगितले होते. यानंतर या प्रकरणाची खूप चर्चा झाली. नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेते नागार्जुन ते ज्युनियर एनटीआर, सामंथा, अखिल अक्किनेनी, प्रकाश राज यांच्यासह अनेक सेलेब्सनी कोंडा सुरेखा यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. आता कोंडा सुरेखा यांनी आपले वक्त्तव्य मागे घेत माफी मागितली आहे.

Samantha Ruth Prabhu आणि Naga Chaitanya यांनी २०१७ मध्ये लव्ह मॅरेज केले होते. २०२१ मध्ये ते वेगेळे झाले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. पण, कोंडा सुरेखा यांनी सामंथा-नागा यांच्या घटस्फोटावरून वक्तव्य करून केटीआर यांना जबाबदार ठरवलं होतं.

काय म्हणाल्या कोंडा सुरेखा?

कोंडा सुरेखा यांनी X अकाऊंटवर माफीनामा लिहिला आणि सामंथाची माफी मागितली. त्या म्हणाल्या की, ''महिलांचा अनादर आणि अपमानावर प्रश्न उपस्थित करण्याचा माझा उद्देश होता. सामंथाच्या भावना दुखावण्याचा उद्देश मुळीच नव्हता.''

सुरेखा यांनी आपले वक्तव्य घेतले मागे

त्यांनी लिहिलं, 'माझे कॉमेंट्स एक नेता म्हणून महिलांचा अपमान केल्याने प्रश्न उपस्थित करण्यावर आहे. सामंथाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता...'

केटीआर यांनी कोंडा सुरेखा यांना पाठवली होती नोटिस

कोंडा सुरेखा यांचे वक्तव्य आणि माफीनामा त्यांना KTR द्वारा कायदेशीर नोटिस पाठवल्यानंतर काही तासांनी आले आहे. केटी रामा राव यांनी कोंडा सुरेखा यांना म्हटले होते की, त्यांनी २४ तासांच्या आत माफी माागावी, नाहीतर त्यांच्याविरोधात मानहानी आणि गुन्हा नोंदवला जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT