पुढारी ऑनलाईन डेस्क - कोलकाता रेप आणि मर्डर केस वरून संपूर्ण देशभरात आंदोलने सुरु आहेत. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने १४ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. या आंदोलनात तिच्याशिवाय ऋद्धी सेन, अरिंदम सिल आणि मधुमिता सरकार यासारख्या अभिनेत्री होत्या. मिमी चक्रवर्ती २०१९ ते २०२४ पर्यंत जादवपूर लोकसभा मतदारसंघाची खासदार होती. अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने मंगळवार (२० ऑगस्ट) रोजी म्हटले की, जेव्हापासून तिने कोलकाता रेप अँड मर्डर केसविषयी पोस्ट शेअर केली आहे, तेव्हापासून तिला सोशल मीडियावर रेपची धमकी मिळत आहे आणि अश्लील मेसेज मिळत आहेत.
दरम्यान, आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात बलात्कार-हत्येच्या घटनेवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं की, "ही जी घटना आहे, ती खूप निंदनीय आहे. जे नुकसान त्या कुटुंबाचे झाले आहे, आणि संपूर्ण समाजावर जो आघात झाला आहे...खूप चिंताजनक आहे."
अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं की, 'आम्ही इथे महिलांसाठी न्याय मागत आहोत, हो ना? हे त्यातीलचं आहे. गर्दीत मुखवटा घातलेल्या लोकांकडून बलात्काराची धमकी मिळणे सामान्य बाब झाली. जे म्हणतात की, ते महिलांसोबत उभे आहेत. कोणते संस्कार, शिक्षण याची परवानगी देतो?'