काश! मैं भी लडका होता; Kolkata Murder Case वर आयुष्मानसह अनेकांच्या प्रतिक्रिया Ayushmann Khurrana, Printi Zinta
मनोरंजन

Kolkata Rape & Murder |'काश! मैं भी लडका होता' - सिनेसृष्टीतून तीव्र संताप

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या निदर्यी घटनेनंतर संपुर्ण देशात एकच खळबळ माजली. यानंतर घटनेविरोधात देशभरात डॉक्टरसह अनेकांनी निषेध व्यक्त केला. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना, प्रिंती झिंटा, प्रसिद्ध गायिका शिल्पा राव, गायिका नेहा भसीन, नंदिता दास याच्यांसह अनेकांनी या घटनेवर आपआपली प्रतिक्रिया दिली आहे. तर आयुष्मान खुरानाने कोलकाता निर्भया कांडवर एक कविता लिहिली आहे.

अभिनेता आयुष्मान खुरानाने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर कवितेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या कवितेत त्याने 'काश! मैं भी लडका होती' असे म्हणत सुरूवात केली आहेत.

आयुष्मानची कविता

मैं भी बिना कुंडी लगाकर सोती, काश मैं भी लड़का होती। झल्ली बनकर दौडती उडती, सारी रात दोस्तों के साथ फिरती, काश मैं भी लड़की होती।

कहते सुना है सबको कि लड़की को पढ़ाओ-लिखाओ सशक्त बनाओ।

और जब पढ़-लिखकर डॉक्टर बनती तो मेरी मां ना खोती उसकी आंखों का मोती, काश मैं भी लड़का होती।

36 घंटे का कार्य दुश्वार हुआ, बहिष्कार हुआ, बलात्कार हुआ, पुरुष के वहशीपन से साक्षात्कार हुआ।

काश! उन पुरुषों में भी थोड़े से स्त्रीपन की कोमलता होती। काश मैं ही लड़का होती।

कहते हैं सीसीटीवी नहीं था, होता भी तो क्या होता।

एक पुरुष सुरक्षाकर्मी जो उस पर नजर रखता, उसकी नजर भी कितनी पाक होती? काश में एक लड़का होती।

अगर मैं एक लड़का होती शायद आज मैं भी जिंदा होती। असे या कवितेच्या ओळी त्याने म्हटल्या आहेत. या कवितेतून आयुष्यमानने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा तिच्या इन्स्टाग्रामवर या घटनेबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलंय की, ''जगात आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. निवडणुकीत पुरूष आणि महिला दोघांना मतदानाचा समान अधिकार आहे. काही महिला निवडणुकीत अग्रेसर आहेत. काही ठिकाणी त्या पुरूषानाही मागे टाकत आहेत. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता समोर आला आहे. कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आलेली घटना खेद व्यक्त करणारी आहे. या घटनेतील आरोपिंना लवकरात- लवकर शिक्षा सुनवली पाहिजे.'' यासोबत प्रसिद्ध गायिका शिल्पा राव, गायिका नेहा भसीन, नंदिता दास यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT