किस किसको प्यार करूं 2’ चा ट्रेलर रिलीज झाला असून कपिल शर्मा पुन्हा एकदा अफलातून कॉमेडी घेऊन आला आहे. ट्रेलरमधील मजेदार प्रसंग, पंचलाइन आणि गोंधळामुळे प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. सोशल मीडियावर ट्रेलर जोरदार व्हायरल झाले आहे.
Kapil Sharma movie Kis Kisko Pyaar Karoon 2 Trailer released
मुंबई - कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या फॅन्साठी धमाल घेऊन आला आहे. त्याच्या सुपरहिट चित्रपट ‘किस किसको प्यार करूं’ चा सिक्वेल अखेर प्रेक्षकांसमोर आला असून, निर्मात्यांनी ‘किस किसको प्यार करूं 2’ चा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज केला आहे.
चित्रपटाचा ट्रेलर मजेशीर आणि कॉमेडीने भरपूर आहे. कपिलचा पहिला चित्रपट 'किस किस को प्यार करूं' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता पुन्हा धमाल दाखवायला कपिल शर्मा परतला आहे. कपिल शर्मा सोबत मनजोत सिंहची भूमिका आहे.
या ट्रेलरच्या सुरुवातीलाच कपिलचे संवाद आहेत. तो म्हणाताना दिसतो की, 'एक लड़की से प्यार करता हूं, उसके लिए हिंदू से मुसलमान बना और मुसलमान से क्रिश्चियन बना लेकिन फिर भी वो मुझे नहीं मिली. बल्कि तीनों धर्मों से एक-एक बीवी मिल गई फादर'. तसेच या ट्रेलरमध्ये आश्रम फेम त्रिधा चौधरीचे काही क्लोज सीन्स देखील आहेत.
तीन पत्नींना सांभाळताना करावी लागते तारेवरची कसरत
आता तिन्ही पत्नींपासून सांभाळून राहण्यासाठी कपिलला तारेवरची कसरत करावी लागतेय. हे पाहणे आता मजेशीर असेल की, को आपल्या आयुष्यात तिन्ही पत्नींसोबत कसे आयुष्याचे संतुलन राखतो. त्याच्या आयुष्यात मजेशरी घटना घडतात. लग्न करायचं असते एकीशी पण, दुसरीच आयुष्यात येते. जगापासून लपवून आपले आयुष्य सुख समाधानाने जगण्यासाठी त्याला धडपड करावी लागते.
कधी रिलीज होणार चित्रपट?
चित्रपटाचे दिग्दर्शन अनुकल्प गोस्वामी यांनी केले आहे. १२ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. रतन जैन, गणेश जैन, अब्बास-मस्तान यांनी व्हीनस वर्ल्डवाईड एंटरटेनमेंट अंतर्गत अब्बास मस्तान फिल्म प्रोडक्शनच्या