बॉलीवूड अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने नव्या वर्षाच्या खास निमित्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी घोषणा केली आहे. 40 वर्षीय कीर्ती सध्या तिची लोकप्रिय वेबसीरिज ‘फोर मोर शॉटस् प्लीज’मधील सहकलाकार राजीव सिद्धार्थ याला डेट करत असल्याचे तिने अधिकृतपणे कन्फर्म केले आहे.
नववर्ष साजरे करतानाचे दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत कीर्तीने हे नाते सार्वजनिक केले आहे. कीर्तीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर राजीव सिद्धार्थसोबतचे अनेक फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये दोघेही अतिशय आनंदी आणि जवळीक दाखवत असल्याचे दिसून येते. या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील सहकार्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कीर्ती कुल्हारीने 2016 अभिनेता साहिल सेहगल याच्याशी विवाह केला होता; मात्र दि. 1 एप्रिल 2021 रोजी दोघांनी घटस्फोट जाहीर केला.
यानंतर कीर्तीने मुलाखतींमध्ये सांगितले होते की, लग्नानंतर तिच्या फिल्मी करिअरवर परिणाम झाला होता; मात्र त्या काळात सासरच्या कुटुंबाकडून तिला भरपूर पाठिंबा मिळाला, ज्यामुळे ती पुन्हा अभिनय क्षेत्रात यशस्वी कमबॅक करू शकली.