पुढारी ऑनलाईन डेस्क : नीट परीक्षेतील गोंधळ सर्वांनाच माहिती आहे. २३ जूनला होणारी नीट पीजी परीक्षा देखील स्थगित करण्यात आली. या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे. नीट युजी पेपर लीक तपास प्रकरण आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. नीटचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. अनेक याचिकांवर कोर्ट सुनावणी करेल. यावर ८ जुलै रोजी सुनावणी होईल. त्यांनी विद्यार्थ्यांच्या करिअरची चिंता व्यक्त करत या प्रकरणातील सावळा गोंधळ मांडला आहे. किरण माने यांनी फोसबूक पोस्ट लिहिली आहे.
रिपोर्टनुसार, नीट परीक्षा पेपरफुटीमुळे ३८ लाख विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले आहे. दरम्यान, मराठी अभिनेते किरण यांनी आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहे.
...म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात... या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे....एरवी, मणिपूर धिंड आणि कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्यांकडे माजोरडेपणानं डोळेझाक करणारे हे दगडाच्या काळजाचे लोक... NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला??
इकडे आदित्य ठाकरेंनी 'ॲॅंटी पेपर लीक कायदा आणून सीईटी आयुक्तांवर कारवाई करावी' असा इशारा देणारी दणदणीत प्रेस काॅन्फरन्स घेतली... तिकडे राहुल गांधींनीही असं रान पेटवलं... लगेच अनाजीपंतांपास्नं रंगाबिल्लापर्यंत सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली !
आदित्य ठाकरेंच्या आग्रही मागणीपुढे केंद्रसरकारला नाक घासावं लागलं. 'ॲॅंटी पेपर लीक' कायद्याला शेवटी मंजुरी द्यावीच लागली. आता पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. डायरेक्टर जनरल सुबोधकुमारलाही हाकलावं लागलं. राहुल गांधींनी केलेल्या गंभीर आरोपांपुढे झुकून युजीसी नेटची आणि NEET ची सीबीआय चौकशीही केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान कोण भरुन देणार??? या परीक्षा रद्द करून तरूण पोरापोरींच्या करीयरशी जीवघेणा खेळ खेळला जातोय. मागच्या दहा वर्षांत जवळजवळ पन्नास पेपर लीक झालेत. कितीतरी हुशार, प्रतिभावान पोरापोरींचे आयुष्य उद्धवस्त झालंय..... काहींनी गुणवत्तेला मुरड घालून कमी दर्जाच्या नोकर्या स्विकारल्यात. याचा जाब सरकारला हडसून-खडसुन विचारायला हवा.
या देशात शिक्षण व्यवस्थेचा पुर्णपणे सत्यानाश झालेला आहे. सत्ताधार्यांना 'हिंदु-मुस्लीम, मराठा-ओबीसी, दलित-सवर्ण, मंदिर-मस्जीद' यापलीकडे काहीही दिसत नाहीये. देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही ! जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात ध्यान करायला जा. 'काबिल' माणूस बसवा खुर्चीवर.
जय शिवराय... जय भीम.
- किरण माने.