Kim Kardashian reached in mumbai for anant ambani wedding
किम कार्दशियन अनंत अंबानीच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झाली आहे. यावेळी तिने रिक्षातून सफर केली   Instagram
मनोरंजन

मुंबईत आल्याबरोबर किम कार्दशियनने केली रिक्षाची सफर! म्हणे करायचंय फोटोशूट!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड स्टार किम कार्दशियन काल मुंबईत पोहोचली आहे. ती आज १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणार आहे. दरम्यान, तिने मुंबईत आल्याबरोबर ऑटोरिक्षाची मागणी केली. त्यामुळे प्रोडक्शन हाऊसची तारांबळ उडाली. किम कार्दशियनला ताज पॅलेस हॉटेलजवळ ऑटोरिक्षातून फोटोशूट करायचे आहे. दरम्यान, किमने आपल्या बहिणीसोबत रिक्षातून प्रवास केला. या सफरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

किम कार्दशियनने रिक्षातून सफर केली

किम कार्दशियन अनंत अंबानींच्या लग्नाला हजर

हॉलीवूड सेलिब्रिटी किम कार्दशियनची प्रचंड लोकप्रियता आहे, तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. टाईम्स मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्येही तिचा समावेश होतो. किमचा स्वतःचा सौंदर्य प्रसाधनांचा ब्रँड आहे.

किम कर्दाशियन मुंबईत दाखल झाली

मुंबईत रिक्षातून फिरण्याची दांडगी हौस...

उद्योगपती अनंत अंबानीच्या विवाहासाठी किम मुंबईत आली आहे. पण, तिला फोटोशूटही करायचे आहे, तेही रिक्षासह. रिपोर्टनुसार, तिला लालबाग मसाला मार्केट, सिद्धिविनायक मंदिर येथेही फोटोशूट करायचे आहे. दरम्यान, तिने बहिणीसह रिक्षातून प्रवास केला.

ऑटो रिक्षातून किम आणि बहिण ख्लोची सफर

किमची बहिण ख्लो कार्दशियनने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ऑटो राईडची झलक पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये ख्लो शूट करत आहे. तर किम व्हाईट ड्रेसमध्ये पोज देत आहे. रिक्षामध्ये बसून ख्लो म्हणाली, "किम आणि मी भारतात एका रिक्षामध्ये आहे."

SCROLL FOR NEXT