मनोरंजन

मातृभाषेची लाज वाटते का?; कियारा कान्समध्ये इंग्रजी बोलताच नेटकऱ्यांनी घेतला क्लास

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनालईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी नुकतेच कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर झळकळी. या खास सोह‍ळ्याचे एकापेक्षा हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर केलं आहेत. या फोटोत कियारा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या सोहळ्यानंतर कियाराचा चुकीचे इंग्रजी बोलतानाचा एक व्हिडिओ समोर आला. यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करत नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.

कियारा आडवाणीविषयी 'हे' माहिती आहे काय?

  • अभिनेत्री कियारा आडवाणी फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसली.
  • कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'फगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
  • एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात महेंद्रसिंह धोनीची पत्नी 'साक्षी'च्या भूमिकेत कियारा दिसली.
  • कियारा अडवाणी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न बंधनात अडकली.

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कियारा आडवाणी पोहोचली होती. यावेळी ती ऑफ शोल्डर गुलाबी आणि पिंक- ब्लॅक रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. केसांची स्टाईल, गळ्यात मोत्याची माळ, लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्सच्या निमित्ताने शनिवारी रात्री रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि व्हॅनिटी फेअर युरोप डिनर ठेवण्यात आलं होते. या डिनरमध्ये सन्मानित करण्यात आलेल्या सहा महिलांपैकी कियारा अडवाणी एक होती.

कियाराचा व्हिडिओ व्हायरल

कियारा रेड कार्पेटवर वॉक केल्यानंतर तिने माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की, "हे छान आहे. माझ्या कारकिर्दीत आता एक दशक पूर्ण होत आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. कान्स येथे प्रथमच आल्याबद्दल आणि रेड सी फाऊंडेशन फॉर व्हुमन इन सिनेमाने सन्मानित केल्याबद्दल मी खूप आभारी आहे." हे सर्व कियारा चुकिच्या इंग्रजी भाषेत बोलली आहे.

कियारा झाली ट्रोल

कियाराने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर चुकिचे इंग्रजी कशाला बोलायचे?, मातृभाषेची लाज वाटते का?, आपली जी भाषा आहे तसे बोलावे उगाच चुकिचे बोलू नये?. यासारख्या प्रश्नाचा भडिमार करून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. याशिवाय आणखी एका युजर्सने 'माझं तिच्यावर प्रेम आहे पण हे बोलले मला अजिबात आवडलेलं नाही?' ज्या भाषेत बोलता येते त्यातच बोलावे, तिने स्वतःची भाषा वापरायला हवी होती.' असे अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT