पुढारी ऑनलाईन डेस्क : कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर कॉफी विथ करणचे (kiara-sidharth) पुढील पाहुणे असतील. या एपिसोडमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रायांच्या लव्हस्टोरीची माहिती समोर येणार आहे. कियाराने सिद्धार्थसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी केलीय. दुसरीकडे, शाहिद कपूर आणि करण जोहरने कियारा-सिद्धार्थ लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. (kiara-sidharth)
आयकॉनिक होस्ट करण जोहर कॉफी विथ करणच्या आगामी भागात कियारा अडवाणी दिसणार आहे. कियारासोबत तिचा कबीर सिंग म्हणजेच बहुमुखी अभिनेता शाहिद कपूर असेल. या एपिसोडमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लव्हस्टोरीवर बरंच काही समोर येणार आहे.
चॅट शोमध्ये करण जोहर बॉलिवूडचे क्यूट कपल सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाच्या अफवांवर चर्चा करताना दिसणार आहे. कियारा उघडपणे कबूल करते की दोघे "अधिक क्लोज" आहेत. जेव्हा करणने लग्नाचा प्रश्न केला तेव्हा कियाराने संभाषण सुरू ठेवत सांगितले की तिचा लग्नावर विश्वास आहे. ती म्हणाली, "मी माझ्या आजूबाजूला सुंदर लग्ने पाहिली आहेत आणि मला माझ्या आयुष्यातही ते घडताना पहायचे आहे; पण हे कधी होईल हे मी सांगणार नाही."
कियाराच्या लग्नासाठी करण जोहर आणि शाहिद कपूर खूप उत्सुक दिसत होते. करण आणि शाहिद म्हणतो की, जेव्हाही ते लग्न करतील तेव्हा ते 'डोला रे डोला' गाण्यावर एकत्र नाचतील. शाहिद कपूरने कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना गुड लुकिंग कपल म्हटलं होतं. तेव्हा करण जोहर म्हणाला- गॉर्जियस. मुले छान असतील. कियारा अडवाणीने शाहिद कपूर तिचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाबाबत इशारा देताना शाहिद कपूर म्हणाला , या वर्षाच्या शेवटी एका मोठ्या घोषणेसाठी तयार राहा.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी शेरशाह या चित्रपटात एकत्र काम केले होते. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. या चित्रपटावरही त्यांचे प्रेम फुलले. तेव्हापासून सिद्धार्थ आणि कियारा एकत्र आहेत. यादरम्यान सिद्धार्थ आणि कियाराच्या ब्रेकअपची बातमीही समोर आली होती.