मनोरंजन

जान्हवीनंतर खुशी कपूर रिलेशनशीप कन्फर्म? मिस्ट्रीमॅन वेदांग रैनाचा फोटो शेअर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर आपली बहिण जान्हवी कपूरच्या रिलेशनशीप कन्फर्मनंतर आता चर्चेत आली आहे. जोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून खुशी कपूरने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. यामध्ये तिचा मित्र वेदांग रैनाची देखील भूमिका होती. तेव्हापासून खुशी आणि वेदांग रैनाच्या अफेअरबद्दल चर्चा होतेय. शूटिंगपासूनच दोघे डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

अधिक वाचा-

ख़ुशी कपूर-वेदांगच्या वाढदिवसाच्या बर्थडे विशचा फोटो व्हायरल

२ जून, २०२४ रोजी वेदांग रैनाने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी ख़ुशी कपूरने आपल्या इन्स्टा स्टोरीवर वेदांगचा एक सुंदर फोटो शेअर केला. यामध्ये वेदांग आपल्या डॉगीसोबत दिसला. दोघे एकत्र खूप सुंदर दिसत होते. या फोटोसोबत खुशीने आपल्या नात्याबद्दल कोणतीही हिंट दिली नाही. वेदांगला एका नोटच्या माध्येमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने फोटोवर लिहिलं, "हॅप्पी बर्थडे वेदांग."

अधिक वाचा-

खुशी कपूर-वेदांगसोबत डिनर डेटवर स्पॉट

जेव्हापासून खुशी आणि वेदांगने 'द आर्चीज'मध्ये एकत्र काम केलं आहे. तेव्हापासून त्याच्या डेटिंगची चर्चा आहे. दोघांपैकी कुणीही या वृत्तांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, मुंबईमध्ये मूवी डेटवर स्पॉट करण्यात आलं. त्यावेळी दोघांनीही ब्लॅक कलरचे ड्रेस परिधान केले होते. खुशी ब्लॅक मिडी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. तर वेदांग देखील ऑल ब्लॅक लूकमध्ये कूल दिसत होता.

जेव्हा खुशी मिस्ट्रीमॅनसोबत दिसली…

याआधी एका रेडिट युजरने खुशी कपूरसोबत दुबई एअरपोर्टहून बाहेर पडताना एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती मिस्ट्री मॅन सोबत दिसली होती. खुशी ग्रे-टोन्ड हुडी आणि ट्रॅक पँटमध्ये दिसली होती. तर मिस्ट्री मॅन ग्रे-टोन्ड ट्रॅक पँट आणि व्हाईट टी-शर्टमध्ये पाहण्यात आले होते. फोटोसोबत नेटिजनने लिहिलं होतं, "आता-आता दुबई एअरपोर्टवर खुशी कपूरला एका व्यक्तीसोबत हात पकडताना पाहण्यात आले. आता खुशी कपूरला एका मोठ्या- LV कॅरी ऑन सोबत दुबईत फिरताना पाहण्यात आले. ती खरंच सुंदर आहे."

अधिक वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT