पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिची बहीण खुशबू पटानी ही भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिची सध्या होतेय ती एका व्हिडिओची. ज्यामध्ये ती चिमुकलीला रेस्क्यू करताना दिसतेय. अत्यंत संवेदनशील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ज्यामध्ये खुशबूने एका लहान चिमुकलीला रेस्क्यू केल्याचं दिसतंय. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
खुशबू पाटनीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की, ती एका भग्नावशेष इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या एका भग्न इमारती (खंडहर)मध्ये एक चिमुकली चिखलामध्ये सापडलेली आहे. ती मुलगी गटारसदृश ठिकाणी पडलेली असून रडत आहे.
व्हिडिओत दिसतं की खुशबू तिला अलगद उचलते, तिच्या कपड्यावरील घाण साफ करते आणि तिला घरी नेतात. घरी नेल्यावर ती चिमुरडीला दूध देते आणि तिची काळजीपूर्वक देखभाल करते. विशेष म्हणजे, खुशबू सांगते की, तिच्या आईने सर्वप्रथम त्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला होता आणि त्यानंतर त्यांनी शोध घेतला.
व्हिडिओच्या शेवटी, खुशबू त्या मुलीचा चेहरा दाखवत म्हणते, "जर तुम्ही बरेलीहून असाल आणि ही तुमची मुलगी असेल, तर कृपया संपर्क करा. पण एक सांगते – अशी लहान मुलं असं टाकून जाणाऱ्या आई-वडिलांना पाहून खरंच खूप लाज वाटते."
खुशबूचा हा भरलेला व्हिडिओ पाहून अनेकांनी तिला सलाम केला आहे. अनेकांनी कॉमेंट्समध्ये लिहिलंय की, “तुमच्यासारखी माणसं समाजात अजून हवीत.” काहींनी लिहिलं – “खऱ्या अर्थाने हिरो!”