कृष्णा श्रॉफने खतरों के खिलाडी १४ मधील पहिला स्टंट पूर्ण केला  krishna shroff Instagram
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 14 | कृष्णा श्रॉफने पहिला स्टंट अवघ्या ६ मि. २३ सेकंदात केला पूर्ण

कृष्णा श्रॉफने खतरों के खिलाडी १४ मधील पहिला स्टंट इतक्या मिनिटात केला पूर्ण

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कृष्णा श्रॉफ ही बॉस लेडी म्हणून ओळखली जाते. "खतरों के खिलाडी १४' मधून तिच्या टेलिव्हिजन पदार्पणाने चर्चांना उधाण आलं होतं. शोमध्ये आधीच तिने तिची जागा मिळवली आहे. पहिल्या एपिसोडमध्ये तिने तिचा पहिला स्टंट फक्त ६ मिनिटे २३ सेकंदात पूर्ण केला. लष्करी दर्जाच्या विमानाच्या मागून ध्वज गोळा करण्याचे आव्हान होते आणि वाऱ्याचा प्रचंड दाब असूनही कृष्णाने तो स्टंट पूर्ण केला.

शो प्रीमियर होण्यापूर्वी कृष्णाने सोशल मीडियावर होस्ट रोहित शेट्टीचे आभार व्यक्त केले. तिने लिहिले, “पहिला रिॲलिटी शो, पहिला टीव्ही स्टंट, @itsrohitshetty सह पहिला प्रोजेक्ट. रोहित सरांनी मला प्रोत्साहन दिल्याशिवाय मला मार्गदर्शन केल्याशिवाय आणि माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी सक्षम असल्याच्या कळतंय ! ही हृदयस्पर्शी नोट लिहिताना तिने होस्टसोबत काही फोटो शेअर केले.

खतरों के खिलाडी १४ चे हे आहेत तगडे स्पर्धक

कृष्णा सुमोना चक्रवर्ती, गश्मीर महाजनी, करण वीर मेहरा, असीम रियाझ, शालिन भानोत, निमृत कौर अहलुवालिया आणि इतर स्पर्धकांशी कृष्णा स्पर्धा करणार आहे. एक उद्योजिका आणि आता एक टीव्ही स्टार म्हणून, कृष्णा श्रॉफ येणारे प्रत्येक आव्हान जिंकण्यासाठी सज्ज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT