मनोरंजन

कॅटरिना कैफची मालदीवच्या हनिमूननंतर ‘मेरी ख्रिसमस’ला सुरुवात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल मालदीवला हनिमूनलाही जाऊन आले. आता कॅटरिना तिच्या आगामी चित्रपटांची कामे पूर्ण करण्याच्या मागे लागली आहे. ती 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयारीला लागली आहे. कॅटने सलमान खानसोबतच्या 'टायगर 3' पेक्षा आधी दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या 'मेरी ख्रिसमस'ला प्राधान्य दिले आहे.

या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती सोबत दिसणार आहे. याच आठवड्यात कॅट या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मुंबईतील स्टुडिओतच या चित्रपटाचे शूटिंग शेल्ड्युल असणार आहे. दरम्यान विकी कौशलनेही त्याच्या 'सॅम बहादूर'चे चित्रीकरण सुरू केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT