ज्या बातमीची वाट विकीचे चाह्ते आवर्जुन पाहात आहेत ती बातमी अखेर समोर आली आहे. कतरिना लवकरच आई होणार आहे. विकी आणि कतरिना या दोघानी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्याना बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. गोड बातमी चाहत्याना सांगितली आहे. यावेळी शेअर केलेल्या फोटोमध्ये विकीने प्रेग्नन्ट कतरिनाच्या पोटाला हात लावला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, आम्ही आमच्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट चॅप्टर सुरु करण्याच्या मार्गावर. आमची आयुष्य आनंद आणि कृतज्ञतेने भरून गेली आहेत. (Latest Entertainment News)
पुढील महिन्यात कतरिना बाळाला जन्म देणार असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये विकीने एकट्याने हजेरी लावली तेव्हाच चाहत्यांनी या जोडीच्या आयुष्यात छोटा पाहुणा येणार असल्याचे अंदाज बांधायला सुरुवात केली होती. आता या पोस्टने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कतरिना सध्या शेवटच्या तिमाहीत असून बराच काळ कॅमेरापासून लांब आहे.
कतरिनाने गेल्या दोन वर्षात कोणताही नवीन सिनेमा साइन केला नसून बाळाच्या जन्मांनंतरही ती बराच मोठा मॅटीर्निटी ब्रेक घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लाडक्या कॅटला पडद्यावर पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरिना लंडनमध्ये बाळाला जन्म देणार असल्याचे बोलले जात आहे. काही काळापूर्वी या जोडीला लंडनमध्ये एकत्र फिरताना पाहिले होते. त्यावेळी अनेकांनी कतरिनाचे बेबी बम्प दिसत असल्याचे सांगितले होते
या जोडीने गॉड बातमी जाहीर करताच त्यांच्यावर बॉलिवूडसहित फॅन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यामध्ये सोनम कपूर, रेणुका शहाणे, अक्षया नाईक, सागरिका घाटगे यांचा समावेश आहे