पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कॅटरिना कैफ अनेकदा आपल्या खासगी आयुष्याबद्दलही मोकळीकतेने संवाद साधते. अलीकडेच एका मुलाखतीय तिने आपण आपल्या आयुष्यात कुटुंबासाठी कसा वेळ काढते, याचा ऊहापोह केला.
आघाडीची अभिनेत्री असलेल्या भेटला बॉलीवूडमधील अनेका करारांमुळे सातत्याने बाहेर राहावे लागते; पण यानंतरही पती विकी कौशल आणि कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता यावे, यासाठी ती कसे प्रयत्न करते, हे तिने यावेळी उलगडले.
मी आतापर्यंतच्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहते, त्यावेळी कामातून ब्रेक घेण्याचे महत्त्व मला उलगडले आहे. कुटुंबासह वेळ व्यतीत केल्याने आपल्या सर्वांना नवी ऊर्जा लागते. कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात, तरीही याहूनदेखील एक वेळ राखून ठेवण्यावर माझा भर असतो, असे कॅटरिना यावेळी म्हणाली,
वर्क फ्रंटवर कॅटरिना यापूर्वी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटातून झळकली. या चित्रपटाचा प्रीमियर जानेवारीत झाला. हा एक रहस्यपट असून यात विजय सेतुपतीचीही भूमिका आहे.