आज सगळीकडे करवाचौथचा माहोल आहे. यामध्ये बॉलीवूडच्या सुंदरी देखील कशा मागे राहतील? बॉलीवुडमध्ये सध्या करवाचौथची जोरदार तयारी सुरु आहे. या दिवसासाठी खास मेहंदीही काढली जाते आहे. अनेक सेलिब्रिटींनी खास मेहंदीची पोस्टही शेअर केली आहे. पाहुयात त्यांची पोस्ट आणि फोटो.
शिल्पाने कमळ फुलांचे युनिक डिझाईन हातावर बनवले आहे. यासोबतच तिने स्टोरीमध्ये पूजा थालीही शेयर केली आहे
प्रियंका चोप्राने लेकीसोबत मेहंदी काढलेल्या हाताचा फोटो शेयर केला आहे
शाहिदची पत्नी मीराने त्याच्या नावाची मेहंदी हातावर काढली आहे.
कृती खरबंदाने पहिल्या वहिल्या करवाचौथसाठी खास तयारी केली आहे. तिची हटके मेहंदी अनेकांना आवडते आहे.
अभिनेत्री काजल अग्रवालही करवाचौथसाठी रेडी झाली असून मेहंदीच्या हाताचा फोटो तिने शेयर केला आहे
नवी नवरी हिनाने पतीचे नाव हातावर मेहंदीने काढले आहे