कार्तिक आर्यन हा नव्या पिढीतील लोकप्रिय अभिनेता आहे. विशेषतः त्याची ८ तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. कार्तिक हा सध्या एकापाठोपाठ एक सिनेमे करत असताना बघायला मिळत आहे. आगामी 'भूलभुलैया-३' या चित्रपटामुळे सध्या तो खूपच चर्चेत आहे. हा सिनेमा १ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारआहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूलभुलैया' या सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. पहिल्या भागात खिलाडी अक्षय कुमार याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर दुसऱ्या भागात कार्तिकनेही खूपच धमाल उडवून दिली होती. अशातच त्याची अक्षयसोबत तुलना केली जात आहे.
यावर आर्यनने स्वतः भाष्य केले आहे. कार्तिक म्हणाला की, मी स्वतःला अक्षयच्या पातळीवर कधीच पाहू शकत नाही. माझी तुलना त्याच्याशी केली जाते त्यावेळी मला ते खूपच विचित्र वाटते. मी बालपणापासून त्याचे चित्रपट पाहत आलो आहे आणि मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. 'भूलभुलैया-३' या सिनेमाद्वारे अभिनेत्री विद्या बालन हिने पुनरागन केले आहे, तर धकधक गर्ल माधुरी दीक्षित पहिल्यांदाच हॉरर भूमिकेत बघायला मिळणार आहे. कार्तिकसह राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा हे या सिनेमात झळकणार असून यामध्ये कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे.