पुढारी ऑनलाईन
कियारा आडवाणी सध्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे. पण शीर्षक वाचून तिने सिद्धार्थला डंप करून कार्तिक आर्यनसोबत डेटिंग सुरू केले की काय, असे वाटू शकते. पण असे काहीही नाही. कार्तिक आणि कियारा हे दोघे त्यांच्या 'भुलभुलैय्या 2' मुळे सध्या चर्चेत आहेत. हा चित्रपट मे मध्ये रीलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दोघे आता व्यग्र होतील. त्यानंतर दोघेही एका लव्हस्टोरीसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत. 'सत्यनारारायण की कथा' असे या चित्रपटाचे नाव ठेवले गेले होते, पण नंतर ते बदलण्याची घोषणा केली गेली. चित्रपटाचे नवीन शीर्षक अद्याप घोषित केलेले नाही. समिर विद्वंस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. आता 'भुलभुलैय्या 2' नंतर चित्रपटाच्या शूटिंगला कियारा-कार्तिक सुरुवात करतील.