मनोरंजन

Kareena Kapoor : करिनाचे खरे नाव सिद्धिमा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री करिना कपूर -खान ( Kareena Kapoor ) ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. करिना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. करीनाला बॉलीवूडमध्ये 'बेबो' म्हणून ही ओळखली जाते. मात्र, करिनाचे खरे नाव फार कमी लोकांना माहित आहे. तिला स्वतःचे नाव का बदलावे लागले यामागेही एक मोठे कारण आहे. करिनाचे खरे नाव सिद्धिमा कपूर असे होते.

करीनाच्या ( Kareena Kapoor ) जन्माच्या सहा दिवसांनंतर तिची चुलत बहीण आणि ऋषी कपूर- नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर हिचा जन्म झाला होता. ज्यावेळी दोघी बहिणींचा जन्म झाला होता. त्यावेळी देशात गणेश उत्सवाची धामधूम होती. गणपतींच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांचे नाव लक्षात घेत आजोबा राज कपूर यांनी रिद्धिमा आणि करीनाचे नाव सिद्धिमा ठेवले.

ऋषी नीतू कपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव रिद्धिमा राहू दिले. पण बबीता आणि रणधीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव बदलून करिना ठेवलं. एवढेच नाही तर, बबीता जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्या अन्ना कारेनिना हे पुस्तक वाचत होत्या. म्हणून पुस्तकाच्या शीर्षकावरून अभिनेत्रीचे नाव करिना ठेवण्यात आले.

SCROLL FOR NEXT