पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री करिना कपूर खान लवकरच तिच्या टॉक शो व्हाट वुमन वॉन्टच्या नवीन एपिसोडसह परतणार आहे. शोच्या नवीन सीझनमध्ये रणबीर कपूर, कपिल शर्मा, शेफाली शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटी दिसणार आहेत. निर्मात्यांनी १० मार्च रोजी चॅट शोचा टीझर रीलिज केला. यामध्ये शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व सेलिब्रिटींची झलक दिसत आहे.
प्रोमो व्हिडीओत रणबीर आणि करिना चर्चा करताना म्हणतात की, करण जोहर त्यांच्या खराब इमेजचे कारण आहे. करिनाची मुले जेह आणि तैमूर यांच्याशी तुलना केल्यावर त्याला एकटेपणा जाणवतो, असेही रणबीर म्हणतो. त्याचे फोटो कोणी काढत नाही. रणबीर सांगतो की त्याला सेल्फ रिस्पेक्ट अजिबात नाही, त्याला कोणाचीही माफी मागायला कमीपणा वाटत नाही.
प्रोमोमध्ये रणबीर आणि कपिल व्यतिरिक्त करिना, शेफाली शाह, डिजिटल निहारिका नमह, मासूम मिनावाला आणि रणवीर अलाहाबादी यांच्याशी गप्पा मारताना दिसली. करिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.