Kareena Kapoor Pregnancy : तिसऱ्या प्रेग्नन्सीवर करीना कपूरने दिली प्रतिक्रिया.. म्हणाली.. ‘हट ना बे’  file photo
मनोरंजन

Kareena Kapoor Pregnancy : तिसऱ्या प्रेग्नन्सीवर करीना कपूरने दिली प्रतिक्रिया.. म्हणाली.. ‘हट ना बे’

करीना कपूर खान सध्या तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवांमुळे चर्चेत आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

kareena kapoor reacts to third pregnancy rumors shares photos with caption hat nah be

पुढारी ऑनलाईन : करीना कपूर खान सध्या तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवांमुळे चर्चेत आली आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या अफवांना सुरुवात झाली होती. या चर्चेदरम्यान आता करीनाने स्वतः तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या अफवांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतीच ती परदेशातील दीर्घ सुट्ट्या संपवून मुंबईत परतली आहे. त्यानंतर आता तिच्या तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या अफवांमुळे ती चर्चेत आली आहे. नुकताच करीनाचा एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या प्रेग्नन्सीचे अंदाज लावण्यास सुरुवात केली. मात्र, करीनाच्या टीमने आणि तिची नणंद सबा पटौदीने या अफवा स्पष्टपणे फेटाळून लावल्या. आता करीनाने स्वतः एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत अप्रत्यक्षपणे या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

करीना कपूरला पिझ्झा खाण्याची इच्छा

करिनाने एका यूजरची इन्स्टाग्राम पोस्ट री-शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संबंधित व्यक्ती पोट दाखवत पोझ देताना दिसत आहे. या फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये ‘हम आपके हैं कौन..’ चित्रपटातील ‘चॉकलेट, लाइम जूस’ हे गाणे ऐकू येत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये काही लिहिलेले नसले, तरी पिझ्झा आणि हसण्याचे इमोजी आहेत.

हा व्हिडिओ सेलिब्रिटी हेअर आणि मेकअप आर्टिस्ट मितेश रजानी यांनी शेअर केला होता. करीनाने ही मिरर सेल्फी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर री-पोस्ट केली. त्यासोबत तिने ‘हट ना बे’ असे लिहिले आणि हसण्याचे तसेच पिझ्झाचे इमोजी शेअर केले.

यापूर्वीही पसरल्या होत्या तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या अफवा

याआधी न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवत असतानाही करीनाला अशाच प्रकारच्या अफवांना सामोरे जावे लागले होते. सुट्टीदरम्यान करीनाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. मात्र, सोशल मीडिया यूजर्सनी त्याचा वेगळाच अर्थ काढला आणि तिच्या तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या अफवा वेगाने पसरू लागल्या.

यानंतर करीनाने स्पष्ट केले होते की, पिझ्झा आणि वाइनमुळे तिचे पोट फुगलेले दिसत होते. तसेच तिने लोकांना कोणत्याही गोष्टीचा उगाचच बाऊ करू नका, असे सांगितले होते. आता नुकताच तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रेग्नन्सीच्या अफवा सुरू झाल्या आणि त्यानंतर करीनाची ही नवी इन्स्टाग्राम स्टोरी समोर आली आहे.

प्रेग्नन्सीच्या अफवा कशा सुरू झाल्या?

नुकताच सोशल मीडियावर करीना कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती जिममधून बाहेर पडून आपल्या कारकडे जाताना दिसत होती. त्यावेळी तिच्या टीममधील एक सदस्य छत्री घेऊन तिला पापाराझींच्या कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया यूजर्सनी करीनाच्या लूकवरून ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करीनाची नणंद सबा अली खान पटौदीने एक पोस्ट शेअर करून या अफवा फेटाळून लावल्या. तसेच कोणाच्याही खासगी आयुष्याबद्दल अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही तिने केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT