पुढारी ऑनलाईन डेस्क - संगीत जगतातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित पुरस्कार समारंभ ग्रॅमी ॲवॉर्ड्स अमेरिकेतील लॉस एंजिल्समध्ये सुरु आहे. दरम्यान, ग्रॅमीमध्ये रॅपर कान्ये वेस्ट आणि त्याची पत्नी-मॉडल बियांका सेंसरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने कॅमेरासमोर न्यूड पोज दिल्याने तिला ग्रॅमी ॲवॉर्ड सोहळ्यातून बाहेरचा दाखवण्यात आला. बियांका या सोहळ्यात पारदर्शक कपड्यांमध्ये पोहोचली. रिपोर्ट्सनुसार, दोघांना या कार्यक्रमातून बाहेर करण्यात आले.
पारदर्शक आऊटफिट घातल्याने बियांकाची चर्चा अधिक होत आहे. असे म्हटले जात आहे की, कान्ये वेस्ट आणि त्याची पत्नी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ५ लोकांसोबत पोहोचले होते. यावेळी तिने कॅमेरासमोर पारदर्शक कपड्यांमध्ये न्यूड पोज दिल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रॅपर कान्ये वेस्ट रेड कार्पेटवर पत्नी बियांका सेंसोरी सोबत पोहोचला. यावेळी बियांकाने लॉन्ग कोट परिधान केला होता. पण, कॅमेरासमोर येताच तिने कोट काढला. बियांकाने ट्रान्सपरेंट कपडे परिधान केले होते. उपस्थित सर्व जणांना देखील धक्का बसला. सोशल मीडियावर देखील युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. या कपलला युजर्स ट्रोल करत आहेत. अनेक युजर्स म्हणत आहेत की, बियांकाने स्किन कलरचे ट्रान्सपरंट कपडे घातले आहेत, ज्यामुळे तिचे संपूर्ण शरीर दिसत आहे.