Kantara: Chapter 1 ticket rate price controversy
मुंबई - 'कांतारा चॅप्टर १' विषयी कुठलीही 'कोर्ट' केस नाही. पण, सध्या एक कायदेशीर प्रकरण समोर आले आहे, जे तिकिटींच्या किंमतीवरून आहे. कर्नाटक सरकार द्वारा मल्टीप्लेक्समध्ये तिकिटांच्या किंमतीवर २०० रुपयांचे कॅप लावल्यानंतर चित्रपट उद्योगाने कर्नाटक हायकोर्टात या निर्णयाला आव्हान दिले आहे. कांतारा : चॅप्टर १ ची रिलीज डेट जवळ येताच हा वाद कोर्टात पोहोचला आहे. सरकारने मल्टीप्लेक्ससहित सर्व चित्रपटगृहांमध्ये कर सोडून तिकीटांची किंमत २०० रुपये निश्चित केली आहे. यामुळे कन्नड चित्रपट उद्योगाने आव्हान देत नुकसानीला सामोरे जावं लागणार असल्याचे म्हटले आहे. कर्नाटक हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे, जेणेकरून रिलीज पूर्वी हा वाद मिटावा.
प्रोडक्शन हाऊस आणि मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका निवेदनानुसार, होम्बले फिल्म्स, मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया, कीस्टोन एंटरटेनमेंट आणि व्हीके फिल्म्स यांनी चार जनहित याचिका (पीआयएल) दाखल केल्या आहेत. याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की, राज्याच्या या निर्णयामुळे कर वगळता महसूल आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होईल. "मल्टीप्लेक्समध्ये एकसमान तिकिटांच्या किंमतीमुळे उत्पन्न कमी होईल आणि त्यामुळे निर्माते आणि थिएटर मालकांचे आर्थिक नुकसान होईल," असे याचिकेत म्हटले आहे.
'कांतारा: चॅप्टर १' एक प्रीक्वल आहे, जो मूळचा कांतारा चित्रपटाच्या कहाणीच्या आधी दाखवण्यात येईल. कदंब वंशाच्या शासनकाळातील घटनांवर आधारित हे कथानक असेल.
रिपोर्टनुसार, राज्य सरकारने कर्नाटक सिनेमा (नियमन) नियमात सुधारणा करून ही मर्यादा जारी केलीय. यामुळे राज्यातील कोणत्याही चित्रपटगृहामध्ये २०० रुपयांहून अधिक दर वाढविण्यास मनाई असेल. तथापि, या निर्णयामुळे ७५ पेक्षा कमी जागा असलेल्या प्रीमियम मल्टी-स्क्रीन थिएटरना सूट देण्यात आलीय.
होम्बले फिल्म्स ऋषभ शेट्टीचा कांतारा: चॅप्टर १ चित्रपट २ ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज होईल. या चित्रपटाचे बजेट १२५ कोटी रुपये आहे. सर्वात महाग चित्रपटांपैकी एक हा कन्नड चित्रपट आहे.
चित्रपटाच्या क्रूवर जंगलला नुकसान पोहोचवल्याचा आरोप लागला आहे. स्थानिय लोक आणि क्रू यांच्यात यावरून वाद देखील झाला होता.