Kantara Chapter 1 Actor Rishabh Shetty struggling days
मुंबई : दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट कांताराच्या यशानंतर अभिनेता व दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) चर्चेत आला आहे. कांतारा चॅप्टर १ खरे तर कांताराचे प्रीक्वल आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या निमित्ताने रिलीज झाला. कांताराचे यश सर्वश्रुत आहे. पण या यशामागे त्याचा संघर्षमय प्रवास लपलेला आहे. आज तो कोट्यवधी रुपयांचा मालक असला तरी एकेकाळी त्याला पोट भरण्यासाठी मुंबईत ऑफिस बॉय आणि ड्रायव्हर म्हणून काम करावे लागले होते.
कर्नाटकातील एका साध्या घरातून आलेल्या ऋषभ शेट्टीला अभिनयाची गोडी लहानपणापासून होती. मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईला आला. इथे त्याने जगण्यासाठी ऑफिस बॉयचे काम केले. नंतर तो एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये ड्रायव्हर म्हणूनही कार्यरत होता. रोजच्या धडपडीमुळे त्याला चित्रपटसृष्टीतील लोकांशी ओळख झाली आणि छोट्या-मोठ्या भूमिका मिळायला सुरुवात झाली.
ऋषभ शेट्टीने एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, “मुंबई त्याच्यासाठी खूप खास आहे. मी मुंबईत २००८ ला आलो होतो. त्यावेळी अंधेरी वेस्टच्या एका प्रोडक्शन हाऊसमध्ये मी ऑफिस बॉय आणि एका निर्मात्याचा ड्रायव्हर होतो. त्यावेळी मी वडा- पाव खायचो. त्यावेळी हा देखील विचार केला नव्हता की, मी इथेपर्यंत पोहोचेल. आज तुम्ही पाहू शकता की, एक चित्रपट काय करू शकतो. कालपर्यंत ज्याची कल्पना देखील केली नव्हती, त्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आलो. चित्रपटाच्या माध्यमातून रिकॉग्निशन, प्रेम, रिस्पेक्ट आणि आशीर्वाद मिळाला. ते शब्दांमध्ये व्यक्त करणं कठिण आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरुवात त्याने केली होती. आता अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून तो प्रसिद्ध आहे. आपल्या परिवारासोबत तो लॅविश लाईफ एन्जॉय करत आहे. 'कांतारा'च्या माध्यमातून ऋषभ शेट्टीने आपल्या अभिनयाचा डंकावाजवला. साऊथ ते बॉलीवूडपर्यंत त्याच्या नवाची चर्चा झाली.
ऋषभ शेट्टीने टीव्ही इंडस्ट्रीनंतर २०१२ मध्ये तुघलक मधून चित्रपट इंडस्ट्रीत पाऊव ठेवले. सोबचच निर्मितीकडे तो वळला. त्यानंतर त्याला अनेक हिट चित्रपट मिळाले.
ऋषभ शेट्टीकडे ऑडी क्यू ७, जीप कंपस आणि महिंद्रा थार सारख्या रॉयल गाड्या आहेत. प्रोडक्शन हाऊस आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्याची तगडी कमाई होते. है. रिपोर्टनुसार, २०२२ मध्ये ऋषभची संपत्ती १२ कोटी होती.