Kantara 2 Rishabh Shetty 
मनोरंजन

Kantara 2: रिषभ शेट्टीचा 'कांतारा 2' मधील नवीन लूक समोर, रिलीज डेट समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

रिषभ शेट्टीचा बर्थडे आहे. याचे औचित्य साधत कांतारा 2च्या मेकर्सनी नवीन पोस्टर रिलीज केले आहे

अमृता चौगुले

कांताराच्या पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर कांतारा 2 ची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. आज रिषभ शेट्टीचा बर्थडे आहे. याचे औचित्य साधत कांतारा 2च्या मेकर्सनी नवीन पोस्टर रिलीज केले आहे. हा सिनेमा 2022 मध्ये आलेल्या कांताराचा प्रीक्वेल आहे.

या पोस्टरमध्ये रिषभ एका योद्ध्याच्या अवतारात दिसतो आहे. एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात ढाल त्याने धरली आहे. या पोस्टरचे बॅकग्राऊंडही विनाशकारी युद्धाचे दिसते आहे. ‘जिथे लेजंड जन्म घेतात आणि जंगल गर्जनेचा प्रतिध्वनि येतो. कांतारा एका अद्वितीय कलाकृतिचा प्रीक्वेल ज्याने लाखोंवर गारुड केले आहे.

एक अद्वितीय शक्ति जी लेजंडच्या पाठीशी सतत आहे. रिषभ शेट्टी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा'. हे कॅप्शन देत होमबळे फिल्म्सने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत त्यांनी सिनेमाच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे.

हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2025 ला रिलीज होतो आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मेकर्सनी कांतारा 2 चा पहिला लुक रिलीज केला होता. यामध्ये रिषभ योद्ध्याच्या लूकमध्ये समोर आला होता. त्याच्या एका हातात कुऱ्हाड आणि दुसऱ्या हातात त्रिशूल होते. त्याच्या लूकमधूनच हा प्रीक्वेलदेखील अॅक्शनपॅक्ड असल्याचे समोर येत आहे.

कांतारा 1 साठी रिषभला अभिनयातील प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. या सिनेमात सप्तमी गौडा, किशोर आणि अच्युत कुमारसह इतर अनेक कलाकार होते.

कांतारा 2च्या टीजरमध्ये ज्या जंगलापासून कांतारा 1 संपतो तिथूनच दूसरा पार्ट सुरू होत असल्याचे समोर आले होते.

काही आठवड्यांपूर्वीच झाला होता सेटवर अपघात..

शूटिंग दरम्यान रिषभसहित 30 क्रू मेंबर असलेली नाव पलटली होती. एका जलाशयात सीन शूट करताना हा अपघात घडला होता. अचानक नाव पलटल्याने घाबरगुंडी उडाली होती. पण उथळ पाणी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण या दरम्यान शूट करण्यासाठी नावेत असलेला कॅमेरा आणि इतर साधन सामग्रीही पाण्यात बुडाली. याशिवाय सिनेमासाठी काम करणारे मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन निजू यांचेही निधन यादरम्यान झाले होते. यादरम्यान या सिनेमाला सतत काही ना काही दुर्घटनांचा सामना करावा लागल्याने फॅन्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT