पुढारी ऑनलाईन डेस्क : तमिळ सुपरस्टार सूर्याचा चित्रपट ‘कंगुवा’ १४ नोव्हेंबरला रिलीज झाला. शिवा द्वारा लिखित, दिग्दर्शित पीरियड फँटेसी ॲक्शन ड्रामा 'कंगुवा'ची ओपनिंग निराशाजनक झाली. जाणून घेऊया ‘कंगुवा’ने रिलीजच्या पहल्या दिवशी किती कमाई केली?
‘कंगुवा’ ५ भाषांमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची इतकी चर्चा होती की, चांगले ॲडव्हान्स बुकिंग झाले होते आणि सोशल मीडियावरून हा चित्रपट हिट ठरेल, अशी प्रतिक्रिया आली होती. पण, जेव्हा चित्रपटगृहात सिनेमा रिलीज झाला तेव्हा चित्रपटाच्या कहाणी आणि परफॉर्मन्समध्ये दम दिसला नाही. ‘कंगुवा’ रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
रिपोर्टनुसार, ‘कंगुवा’ने रिलीज पहिल्याच दिवशी २२ कोटींची कमाई केली आहे. ३५० कोटींच्या बिग बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे. वीकेंडला चांगली कमाई करू शकेल, असा अंदाज निर्मात्यांनी बांधला आहे.
‘कंगुवा’मध्ये सूर्याने मुख्य भूमिका साकारली आहे. शिवाय, बॉबी देओल, दिशा पटानी, योगी बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला, आनंदराज, रवि राघवेंद्र, केएस रवि कुमार, जगपती बाबू, नटराजन सुब्रमण्यम आणि बीएस अविनाश यासारख्या अन्य कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
निर्मिती केई ज्ञानवेल राजा, वी वामसी कृष्णा रेड्डी आणि प्रमोद उप्पलपतीने जॉइंटली स्टुडिओ ग्रीन आणि यूवी क्रिएशन्स बॅनर अंतर्गत केली आहे. सिनेमॅटोग्राफी वेट्री पलानीसामीने आणि निषाध यूसुफने एडीटर म्हणून काम केलं होतं. देवी श्री प्रसादने बॅकग्राउंड स्कोर, साऊंडट्रॅक कम्पोज केलं आहे.