मनोरंजन

CISF महिला गार्डची खासदार कंगना रनौत यांना मारहाण, चंदीगड विमानतळावरची घटना

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन : हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून नुकतीच जिंकून आलेली नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंगना राणावतला चंदिगड विमानतळावर कानशिलात लगावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कंगना यांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांना विमानाने दिल्लीला जायचं होतं. सिक्युरिटी चेक इननंतर त्या बोर्डिंगसाठी जात असताना एलसीटी कुलविंदर कौर (सीआयएसएफ युनिट चंदीगड विमानतळ) हिने कानशिलात लगावली. त्यानंतर कंगना रानौत यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. कंगना यांच्या आरोपावरून आता CISF महिला जवानाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रिपोर्ट्सनुसार, कंगना रनौतने याप्रकरणी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यानुसार शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने दिलेल्या वक्तव्यामुळे सीआयएसएफ महिला जवान संतप्त झाल्याचे तिचे म्हणणे आहे. याच कारणामुळे जवानाने कानशिलात मारल्याचा आरोप कंगनाने केलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजकारणात नशीब आजमावण्यासाठी कंगना रानौत पहिल्यांदाच मंडीतून रिंगणात उतरली. भाजपने कंगनाला तिच्या स्वतःच्या जिल्ह्यातून मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. निवडणुकीत कंगनाने जोरदार प्रचार केला. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना कंगनाने 74 हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले.

SCROLL FOR NEXT