पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांचा चित्रपट ‘इमरजन्सी’(Emergency) मागील काही दिवसांपासून वादात सापडला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने आतापर्यंत चित्रपटाला हिरवा सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे या चित्रपटाची रिलीज डेट टळली आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता. पण, रिलीज डेट टळल्याने कंगना रनौत यांनी ‘इमरजन्सी’वर ट्विट केले आहे.
कंगना रनौत यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट करत ‘इमरजन्सी’ पुढे ढकलल्याची माहिती दिलीय. त्याशिवाय, खूप लवकर नव्या रिलीज डेटची घोषणा करेल, असे म्हटले आहे- . तिने लिहिलंय, ‘जड अंत:करणाने माझे दिग्दर्शन असलेला चित्रपट इमरजेन्सी पोस्टपोन झाली आहे. आता आम्ही सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. खूप लवकरच नव्या रिलीज डेटची घोषणा केली जाईल. तुम्ही समजून घेतलं आणि धैर्यासाठी धन्यवाद.’
‘इमरजन्सी’ चित्रपट मागील काही काळापासून वादात सापडला आहे. दरम्यान, सीबीएफसी (सेन्सॉर बोर्ड) नेदेखील कंगनाच्या चित्रपटाला सर्टिफिकेट दिलं नाही. या चित्रपटाची कहाणी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. त्यांनी १९७५ ते १९७७ पर्यंत देशात आणीबीणी जाहीर केली होती.
कंगना रनौतने ‘इमरजन्सी’मध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ती निर्माती देखील आहे. ‘इमरजन्सी’मध्ये कंगना रनौत यांच्याशिवाय अनेक स्टार्सनी काम केलं आहे. अनुपम खेर, श्रेयस तलपदे, मिलिंद सोमन, महिमा चौधरी यांच्या भूमिका आहेत.