Kamlesh Sawant Loss pudhari
मनोरंजन

Kamlesh Sawant Loss: दृष्यम फेम गायतोंडे ७० लाख लॉसमध्ये... बायकोही वैतागली मात्र तरी 'स्वभाव' काही जात नाही

कमलेश सावंत यांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत ७० लाख रूपयांचा लॉस झाला आहे. निर्मात्यांनी त्यांचे ७० लाख बुडवले आहेत.

Anirudha Sankpal

Kamlesh Sawant loss: नुकतेच अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट दृष्टम ३ रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या मालिकेत पहिल्यापासून पोलीस इनस्पेक्टर गायतोंडे ही भूमिका मराठी कलाकार कमलेश सावंत यांनी साकारली आहे.

नुकतेच कमलेश सावंत यांनी मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मराठी आणि हिंदी माध्यमात चांगल्या आणि मोठ्या भूमिका साकारणारे कमलेश हे जवळपास ७० लाख लॉसमध्ये असल्याचं सांगितलं. त्यांनी हे पैसे रिकव्हर देखील करण्याचा प्रयत्न केला नाही असं हसत हसत सांगितलं. यामुळं मित्र म्हणे फेम सौमित्र पोटे यांना आश्चर्याचा धक्का बसला.

एवढी संतवृती कोठून येते

मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये कमलेश सावंत यांनी सौमित्र पोटे यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत कमलेश सुतार यांनी आपण पैशाकडून खूप बुडालो असल्याचे सांगितलं. त्यांनी आपण आतापर्यंत ७० लाख लॉसमध्ये असल्याचं सांगताच सौमित्र पोटे यांना धक्का बसला.

कमलेश पुढे म्हणतात की मला माझा हिशेबच माहिती नसतो. पण जाऊ दे काय फरक पडतो. ते माझे नव्हते असं म्हणायचं. त्यावर कमलेश एवढी संतवृत्ती कुठून येते असं विचारतात. काळा चौकी इथं राहणारी लोकं घरात घुसून वसूल करणारी आहेत असं देखील ते म्हणतात.

माझा स्वभाव नाही

मात्र माझा स्वभाव तसा नाही असं सांगत कमलेश यांनी मी लग्नाआधी दोनदा पैसे मागायला फोन करत होतो. तिसऱ्यावेळी पैसे द्या नाहीत जावा असं सांगत होतं.

कमलेश यांनी हा काही माझा मोठेपणा नाही माझा स्वभाव आहे. वडिलांमुळं असा स्वभाव असेल का मला माहिती नाही. कमलेश म्हणतो की प्रोड्युसर गेले. काही प्रोड्युसरने प्रोडक्शन बंद केलं. अशी कारणे सांगितली.

त्यावर सौमित्र यांनी तू पैसे मागत नाहीस गेले ते पैसे? असा प्रश्न विचारला. त्यावर कमलेश यांनी हो काय करणार असं उत्तर दिलं. मला सारखं सारखं मागयला आवडत नाही. मी काम चोख करतो ना यार. मला काम मिळतं कारण माझा स्वभाव तसा आहे. मी कुठं टँट्रम दाखवत बसू असं प्रांजळ उत्तर कमलेश देतात.

माझी बायको माझ्या मागे लागते

यावर सौमित्रने तू तुझी सवय बदललीस का नाहीस तू कामाआधी १०० टक्के अॅडव्हान्स घेतो, डबिंगच्या आधी पूर्ण पेमेंट झालं पाहिजे असं काही म्हणतोस की नाही.

त्यावर कमलेश सावंत यांनी माझी बायको असं करते. माझ्या मागे लागते पण मी नाही म्हणतो. मी म्हणतो मला रिलेशनमुळे कामे मिळतात. प्रत्येक इंडस्ट्री वेगळी असते. तुझा बिजनेस वेगळा आणि माझा वेगळा आहे असं मी सांगतो.

त्यावर आता तूच लॉस होऊ नये म्हणून काय करायचं हे तूच सांग असा प्रतिप्रशन करतो. तू ७० लाख सहन केलेस मात्र दुसरा कोणीतरी आयुष्यातून उठायचा असं देखील सौमित्र म्हणतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT