Kamal Haasan on Kannada Language Controversy
नवी दिल्ली - ‘मला आधीही खूप धमक्या मिळाल्या आहेत. जर मी चुकीचा नसेल तर माफी मागणार नाही. आणि जर चुकलो असेल तर माफी मागेन.’ असे म्हणत तमिळ अभिनेते, मक्कल निधि मय्यम (MNM) चे अध्यक्ष कमल हासन यांनी स्पष्टोक्ती दिली. कन्नड भाषेबद्दल केलेल्या विधानावरून कमल हासन चर्चेत आहेत.
तमिळ अभिनेते कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल दिलेल्या तथाकथित वक्तव्यावर आता मौन सोडले आहे. त्यांनी केलेल्या विधाननांतर वाद निर्माण झाला. ज्यामुळे काही कन्नड समर्थक संगघटनांनी त्यांच्या आगामी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिलीय. या संघटनांनी नाराजी जाहीर करत हासन यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.
या प्रकरणावर कमल हासन यांनी स्पष्ट केले की, त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. जर ह वक्तव्य सिद्ध होते, कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यांना माफी मागण्यात कुठलीही खंत नसेन. पण जर त्यांनी काही चुकीचे म्हटले नसेल तर ते आपल्या वक्तवयावर कायम राहतील.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले- "ही एक लोकशाही आहे. मी कायदा आणि न्यायवर विश्वास करतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळसाठी माझं खरं प्रेम आहे. ज्या लोकांचा काहीतरी अजेंडा आहे, त्यांच्याशिवाय, कुणीही यावर संशय घेणार नाही. मला आधीही धमक्या दिल्या आहेत. आणि जर मी चुकीचा असेन तर मी माफी मागेन. जर मी चुकीचा नाही तर मी माफी मागणार नाही..."
कमल हासन यांचा नवीन चित्रपट 'ठग लाईफ'चे काही आठवड्यांपूर्वी ऑडिओ लाँच चेन्नईत झाले. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमातील भाषणाची सुरुवात त्यांनी "उयिरे उरावे तमिळ" या वाक्याने केली होती. या वाक्याचा अर्थ 'माझे जीवन आणि माझे कुटुंब ही तमिळ भाषा आहे', असा आहे. या कार्यक्रमात कन्नड अभिनेते शिवराजकुमार उपस्थित होते. याबाबत बोलताना कमल हसन म्हणाले होते - ही जमीन (चेन्नई) माझे कुटुंब आहे, या भावनेतून शिवराजकुमार हे चेन्नईला आले आहेत. म्हणूनच मी माझ्या भाषणाची सुरुवातही 'माझे जीवन आणि माझे कुटुंब ही तमिळ भाषा आहे,' अशी केली आहे. तसेच शिवराजकुमार यांच्याकडे पाहत तुमची भाषा म्हणजे कन्नड भाषेचा जन्म हा तामिळमधून झाला आहे. कन्नड भाषेची उत्पत्ती तामिळ भाषेतून झाल्याने तुमचाही यामध्ये समावेश होतो.