पुढारी ऑनलाईन : अजय देवगण आणि काजोलचा ( kajol ) नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर घाबरू नकोस अजय, मी व्यसन करणार नाही, अशी काजोलने कमेंट केली आहे. अजयने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या 'रन वे 34' आणि त्याची पत्नी काजोलच्या 'त्रिभंगा' या चित्रपटांमधील समांतर असे दोन सीन आहेत.
पहिल्या व्हिडीओमध्ये काजोल हातामध्ये सिगारेट पकडून असते. ती सिगारेट पेटवणार इतक्यात नर्स येऊन तिला 'धूम्रमान करण्यास मनाई आहे' असे सांगते. त्यानंतर सिगारेट पेटवली तर नाही आहे ना? असे काजोल सांगते, दुसर्या व्हिडीओमध्ये अजय तोंडात सिगारेट ठेवून उभा असतो. त्याला शेजारचा माणूस 'धूम्रपान करू नका' असे सांगतो. त्याला उत्तर देताना तो देखील सिगारेट पेटवली तर नाही आहे ना, असे अजय म्हणतो.
दोन व्हिडीओ एकत्र करून तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत अजयने 'अरे, काजोलने मला हरवले.' असे म्हटले आहे. या पोस्टखाली काजोलने 'घाबरू नको, मी हे व्यसन करण्याचा विचारही करणार नाही.' कमेंट केली आहे.