मनोरंजन

Kajol : ‘इतकी गोरी कशी झाले ?’ काजोलचे भन्नाट उत्तर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोलला तिचे चाहते कायम तिच्या त्वचेच्या रंगावरून प्रश्वन विचारतात. तिला ट्रोल करत स्किन लाइटनिंग ट्रिटमेंट केली का, असा सवाल करतात. काजोलने ( Kajol ) आता याला कंटाळून सोशल मीडियावर याचे खास अंदाजात उत्तर दिले आहे.

Kajol ने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तिने संपूर्ण चेहरा झाकला आहे. त्यावर तिने उन्हापासून बचाव होण्यासाठी काळा रंगाचा गॉगलही लावला आहे. या गेटअपमध्ये काजोल ओळखू येत नाही. तिने लिहिले आहे, हा फोटो त्या सर्वांसाठी आहे, जे मला नेहमी इतकी गोरी कशी झाले असा सवाल करतात. काजोलला तिच्या त्वचेच्या रंगावरून कायम ट्रोल केले जाते.

२०१४ मध्ये एका मुलाखतीवेळी काजोलने स्किन लाइटनिंगच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले होते. मुलाखतीमध्ये तिने कोणतीही स्किन व्हाइटनिंग सर्जरी केली नसल्याचे सांगितले होते. काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा हिलाही तिच्या स्किन टोनसाठी अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. सध्या न्यासा शिक्षण घेत आहे. बॉलीवूड सेलेब्समध्ये स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट्स खूप सामान्य आहेत. या उपचारांसाठी २० ते ६० हजार खर्च येतो.

SCROLL FOR NEXT