काजल अग्रवाल सिकंदर चित्रपटात भूमिका साकारणार असल्याचे समजते  Instagram
मनोरंजन

Kajal Aggarwal : सलमान खान-रश्मिका मंदानाच्या 'सिकंदर'मध्ये काजल अग्रवालची एन्ट्री?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - सलमान खान-साजिद नायिडावालाने पुन्हा एकदा सिकंदर या चित्रपटातून एकत्र येत आहे. आगामी चित्रपट सिकंदरचे दिग्दर्शन ए आर मुरूगनदास यांनी केलं आहे. आता रिपोर्टनुसार, साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल सिकंदरमध्ये काम करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये तिची भूमिका काय असेल, याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Sikandar Movie मध्ये सलमान खानची कोणती भूमिका असणार?

सिकंदर चित्रपटात सलमान खानची भूमिका अँग्री यंग मॅनची असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. असे म्हटले जात आहे की, सलमान खानची भूमिका क्रोध आणि रागाने भरलेली असेल.

सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाची काय आहे कहाणी?

सिंकदरमध्ये सलमान खान एका अशा व्यक्तीच्या भूमिकेत असेल, जो समाजात असणारी एक मोठी टोळी संपवण्यासाठी संपूर्ण ताकद लावतील. मनाला स्पर्थून जाईल, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

कधी रिलीज होणार सलमान खानचा चित्रपट सिंकदर?

सिंकदर चित्रपट साजिद नाडियावालाच्या सर्वात महत्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे आणि ईदच्या निमित्ताने २०२५ ला सिनेमागृहात रिलीज होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT