मुंबई; पुढारी ऑनलाईन : 'कांटा लगा' म्युझिक व्हिडिओतून स्टारडम मिळवणारी शेफाली जरीवाला 'बिग बॉस-१३' मध्ये चर्चेत आली. या रिॲलिटी शोमधून तिचे फॅन फॉलोइंग आणखी वाढले. सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असलेली शेफालीची आता पुन्हा चर्चा होत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टाइलिश आणि हॉट फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बोल्ड दिसत आहे. तिचे सौंदर्य आणि बोल्ड अदांवर इन्स्टावर भरभरून कमेंट येत आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो
शेफालीने रेड कलरच्या बिकिनीत हे सुंदर आणि बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. तिने कॅप्शन लिहिली आहे-'गर्मी मजा चखाने का वक्त आ गया है.'
फोटोंमध्ये शेफाली स्विमिंग पुलामध्ये दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये ती 'सिंबा' या तिच्या डॉगसोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये फॅन्स शेफाली जरीवालाच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहेत. एका चाहत्याने तिला 'गोल्डन फिश' म्हटलं आहे. तर आणखी एका चाहत्याने तिचं सौंदर्य आणि फिटनेसचं रहस्य काय आहे, असा प्रश्न विचारला आहे.
पहिल्या लग्नाचा केला होता खुलासा
शेफाली जरीवालाने एका मुलाखतीत आपल्या पहिल्या लग्नाविषयी सांगितलं होतं. तिने यावेळी आपल्या घटस्फोटाविषयीही सांगितलं होतं. तिला पहिल्या लग्नानंतर मानसिक त्रासदेखील सहन करावा लागला असल्याचे तिने म्हटले होते. शेफालीचे लग्न मीत ब्रदर्स फेम हरमीत सिंहशी झाले होते. परंतु, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. अखेर २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर शेफाली जरीवालाने २०१४ मध्ये अभिनेता पराग त्यागीशी विवाह केला.
'कांटा लगा'मधून झाली स्टार
शेफालीने २००२ मध्ये 'कांटा लगा' गाण्याच्या रीमिक्समधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हे गाणे सुपरहिट ठरले. यानंतर शेफाली 'कांटा लगा गर्ल' म्हणूम प्रसिध्द झाली. यानंतर ती 'बुगी वुगी', 'नच बलिए' आणि 'बिग बॉस-१३' मध्ये दिसली होती.
all photos – shefalijariwala insta वरून साभार