पुढारी ऑनलाईन डेस्क - साऊथ कोरियाचा के ड्रामा अभिनेता पार्क मिन जे चे कार्डियक अरेस्टने निधन झाले. तो ३२ वर्षांचा होता. अनेक हिट शोजमध्ये त्याने काम केले होते. २ डिसेंबर, २०२४ रोजी त्याची एजेन्सी बिग टायटलने पार्कच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्याच्या निधनाचे वृत्त समोर येताच सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. (K-drama actor Park Min Jae Dies)
पार्कने खूप कमी वयात लोकप्रियता मिळवली होती. एजन्सी बिग टायटलने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत लिहिलं, 'पार्क मिन जे, ज्याला अभिनयाशी खूप प्रेम होतं. तो नेहमी आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा. आता तो सर्वांना सोडून गेला आहे. आम्ही त्याच्या प्रती तुमच्या द्वारे मिळालेले प्रेम आणि समर्थनासाठी खूप आभारी आहोत. आता आपण त्याला अभिनय करताना पाहू नाही शकत. पण आम्ही त्याला नेहमीच बिग टायटलचा अभिनेता म्हणून अभिमानाने आठवण करू. त्याच्या आत्म्याला शांती मिळो'. (K-drama actor Park Min Jae Dies)
त्याच्या एजन्सीने पोस्टमध्ये खुलासा केला आहे की, २९ नोव्हेबर, २०२४ रोजी कार्डियक अरेस्टमुळे त्याचे चीनमध्ये निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ४ डिसेंबर रोजी सियोल नॅशनल युनिव्हर्सिटी रुग्णालयात केले जाईल. तिथे एक शोकसभा देखील असेल.