जस्टिन बीबरच्या पाळणा हलला आहे Instagram
मनोरंजन

Justin Bieber | जस्टिन बीबरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

जस्टीन बीबरची पत्नी हेलीने मुलाला दिला जन्म

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर आणि मॉडल हेली बीबर यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हेलीने मुलाला जन्म दिला आहे. जस्टीनने स्वत: ही आनंदाची वार्ता इन्स्टाग्रामवर दिली आहे. सोबत तान्हुल्या पावलांचा फोटोदेखील शेअर केला आहे. शिवाय, २४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या या बाळाचे नावदेखील काय ठेवलं आहे, याबद्दल सांगितले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वेलकम होम जॅक ब्लूज बीबर.'

हेलीने काही वेळानंतर इन्स्टाग्राम स्टोरीजवर फोटो पोस्ट करून मुलाचे नाव सांगितले.

जस्टिन बीबरवर अभिनंदनाचा वर्षाव

जस्टिन बीबरने हेलीच्या प्रेग्नेंसी विषयी सोशल मीडियावर माहिती दिली होती. यावर्षी तो भारतात अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी देखील आला होता. मुंबईच्या जियो सेंटरमध्ये त्याचा कॉन्सर्ट झाला होता. त्याचे तमाम क्लिप्स व्हायरल झाले होते. जस्टीनवर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फोटोग्राफर डब्बू रतनानी आणि अभिनेत्री स्मृती खन्नाने शुभेच्छा देखील दिल्या. 'द एलेन शो' मध्ये एकदा त्याने म्हटलं होतं की, 'हेलीलवर अवलंबून आहे की, तिला किती मुले हवी आहेत.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT