अभिनेत्री जुई गडकरी  pudhari
मनोरंजन

Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरीने शेयर केली खास न्यूज; ‘ठरलं तर मग मालिकेतून घेतला ब्रेक?

पुढचे पाउल या मालिकेतून निरागस सुनेच्या व्यक्तिरेखेतील जुई चांगलीच लोकप्रिय झाली

अमृता चौगुले

सालस चेहरा आणि उत्तम अभिनय याच्या जोरावर प्रेक्षकांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. पुढचे पाउल या मालिकेतून निरागस सुनेच्या व्यक्तिरेखेतील जुई चांगलीच लोकप्रिय झाली. यानंतर सरस्वती, वर्तुळ आणि ठरल तर मग या मालिकेत दिसली. याशिवाय जुईने मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतला होता. तसेच सिंगिंग स्टार या रिअलिटी शोमधून तिने तिच्या सुरेल आवाजाची झलक दाखवली होती. (Latest Entertainment News)

अभिनय, नृत्य, गायन या सगळ्यात आपल्या कलेचे दर्शन घडवल्यानंतर जुई आता एका नव्या अध्यायांसाठी सज्ज झाली आहे. जुई आता लेखिका म्हणून पदार्पण करणार आहे. कॉकटेल स्टुडियोच्या माध्यमातून समोर येणाऱ्या एका वेबसिरिजच्या लेखनाची धुरा तिने सांभाळली आहे.

अलिकडेच घटस्थापनेच्या मुहूर्तावर तिने इन्स्टा स्टोरीमधून तिने ही बातमी शेयर केली आहे. ‘लवकरच लेखिका म्हणून सुरुवात' असे कॅप्शन देत तिने क्लॅप चा फोटो शेयर केला आहे.

या सिरिजचा मुहूर्त झाला असून जुईने कामाला सुरुवातही केली आहे. अनसॉल्व असे तिच्या नव्या सीरिजचे नाव आहे.

जुई गडकरी ठरले तर मग सोडणार का?

जुई सध्या ठरलं तर मग या मालिकेत सायलीच्या व्यक्तिरेखेत दिसते आहे. नवीन कामामुळे ती ही मालिका सोडणार का अशी चर्चा होते आहे. पण जुईने याला नकार दिला असून ती मालिकेतही काम करत राहणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिचे चाहते मात्र कमालीचे खुश आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT