अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची जुगलबंदी जॉली एलएल बी 3 मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचा टिजर नुकताच रिलीज झाला आहे. अर्थातच या टीजरमध्ये जजच्या भूमिकेतील सौरभ शुक्ला पण दिसत आहेत (Latest Entertainment News)
1 मिनिट 30 सेकंदाच्या या टीजरमध्ये पुन्हा एकदा कोर्टरूम ड्रामा रंगतो आहे. यामध्ये एक घोषणा होते आहे ज्यात जगदीश त्यागी फ्रॉम मेरठ नावाची घोषणा होते. यानंतर स्क्रीनवर दिसतो तो सगळ्यात पहिलं जॉली म्हणजेच अर्शद वारसी. यानंतर पुकारा होतो तो जगदेश्वर मिश्रा उर्फ जॉली फ्रॉम कानपूर अशी. यामध्ये दिसतात ते जजच्या भूमिकेतील सौरभ शुक्ला.
हे जॉली समोर येतात आणि मग सूरु होतो अभूतपूर्व गोंधळ. नेहमीप्रमाणेच वैतागलेले सौरभ शुक्ला या सिनेमात रंगत आणत आहेत. सुभाष कपूरचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी विनोदाची पर्वणी असणार आहे.
जॉली एलएल बी 3 हा सिनेमा 19 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
या सिनेमात अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी आणि अमृता राव हे कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाच्या 3 ऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
जॉली एलएल बी या सिनेमाचा पहिला पार्ट 2013 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात अर्शद वारसी, सौरभ शुक्ला आणि बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर या सिनेमाचा दूसरा पार्ट 2017 मध्ये आला या सिनेमात अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अनू कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. यात जॉलीच्या भूमिकेत अर्शद ऐवजी अक्षय दिसला होता. आता आठ वर्षांनंतर या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.