जॉली एलएल बी सिनेमा फ्रँचाईजीमधील तिसरा सिनेमा आता ओटीटी चॅनेलवर दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगला गल्ला जमावला आहे. आता थिएटरमध्ये गर्दी खेचल्यानंतर आता ओटीटीवरील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. सुभाष कपूर यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा आता घरबसल्या पाहता येणे शक्य होणार आहे.
कोणत्या तारखेला जॉली एलएलबी 3 ओटीटीवर दिसणार?
हा सिनेमा 14 नोव्हेंबरला वरील दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. मेकर्सनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार जॉली एलएलबी 3 ?
जॉली एलएलबी 3 यावेळी एक नाहीतर दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. जियो हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा दिसणार आहे.
या सिनेमात कोण कोण कलाकार आहेत?
या सिनेमात अक्षय कुमार, अर्शद वारसी, हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला, गजराज राव, सीमा बिस्वास, राम कपूर, अमृता राव यांच्या भूमिका आहेत.
या सिनेमाची संकल्पना काय आहे?
या कोर्टरूम ड्रामामध्ये शेतकरी आणि त्यांच्या जमीनी याविषयीचा मुद्दा आणि त्यासाठी दिला गेलेला लढा दिसतो आहे. यासाठी दोन्ही जॉली कोर्टात भिडताना या सिनेमात दिसत आहेत