Jennifer Lopez घटस्फोट घेणार Jennifer Lopez Instagram
मनोरंजन

Jennifer Lopez Divorce : बेन एफ्लेकशी घटस्फोटासाठी जेनिफर लोपेजचा अर्ज

Jennifer Lopez घटस्फोट घेणार, अर्ज केला दाखल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेक घटस्फोटामुळे दीर्घकाळ चर्चेत आहेत. आपल्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघेही घटस्फोट घेत आहेत. मीडिया रिपोट्सनुसार, मंगळवार, २० ऑगस्ट रोजी जेनिफर लोपेजने एलए काउंटी सुपीरियर कोर्टमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघांनी अधिकृतरित्या वेगळे होण्याची तारीख २६ एप्रिल सांगण्यात आली आहे.

जेनिफर लोपेज-बेन एफ्लेक फॅन्सची आवडती जोडी

जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेक हॉलीवूडच्या प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे. दोघांच्या जोडीला लाखो लोक पसंत करतात. जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेकने २०२२ मध्ये लग्न केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेकने दोन दोन वेळा लग्न केले आहे, ते ही एकाच वर्षात. त्यांनी पहिले लग्न जुलै २०२२ मध्ये लास वेगासमध्ये लग्न केले होते. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये जॉर्जिया येथे दुसऱ्यांदा लग्न केले होते.

या चित्रपटात बेन एफ्लेक-जेनिफर लोपेजने एकत्र केले काम

बेन एफ्लेक आणि जेनिफर लोपेजने सोबत दोन चित्रपट केले. २००३ मध्ये मार्टिन ब्रेस्टचा बहुचर्चित रोमँटिक चित्रपट गिगली आणि २००४ मध्ये केविन स्मिथचा कॉमेडी चित्रपट जर्सीमध्ये दोघे एकत्र दिसले होते. रिपोर्टनुसार, जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेकने २००२ ते २००४ पर्यंत एकमेकांना डेट केलं आहे.

जेनिफरने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी टूर केली होती रद्द

लोपेजने अल्बम 'दिस इज मी नाउ' मध्ये स्पष्ट केलं की, तिची मुले आणि जवळच्या मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्यासाठी ती टाईम स्पेंड करत आहे. म्हणूनचं मे मध्ये तिने आपली 'दिस इज मी नाउ' टूर रद्द केली होती. हा अल्बम तिचा २००२ चा 'दिस इज मी देन' चा सीक्वल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT