मनोरंजन

Jennifer-Ben Affleck : प्रेम, एंगेजमेंट, ब्रेकअप आणि २० वर्षांनी लग्न!

स्वालिया न. शिकलगार

अखेर अभिनेता बेन अ‍ॅफलेक आणि अभिनेत्री-गायिका जेनिफर लोपेझ हे अलीकडच्या काळात पुन्हा चर्चेत आलेले सुप्रसिद्ध हॉलीवूड कपल विवाहबद्ध झाले आहे.
20 वर्षांपूर्वी 2002 मध्ये हे दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लगेचच एंगेजमेंट करून टाकली. पण नंतर दोघांचे काय बिनसले कोणास ठाऊक, अचानक दोघे वेगळे झाले. दरम्यानच्या काळात दोघांची इतरांसोबत अफेअर्सही झाली. त्यातून त्यांना मुलेही झाले. पण अचानक दोन वर्षांपासून दोघेही पुन्हा एकमेकांना डेट करू लागले. अगदी खुलेआमपणे दोघेही एकमेकांवरील प्रेमाचा पुरस्कारा करताना दिसून आले. एप्रिलमध्ये त्यांनी पुन्हा एंगेजमेंट केली. एकंदरीत गेल्या दोन वर्षांत हॉलीवूडसह जगभरात या कपलची खूप चर्चा होती. अखेर दोघांनी लास वेगासमध्ये 16 जुलै रोजी ठरावीक मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. जेनिफर 52 वर्षांची असून तिचे हे चौथे लग्न आहे. तर बेन 49 वर्षांचा आहे. जेनिफरने स्वतःचे आडनाव बदलून आता अ‍ॅफ्लेक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT