जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांच्या नात्याची गेल्या महिन्यांपासून चर्चा आहे. जान्हवी ही अनेक मुलाखतींमध्ये तिचा प्रियकर शिखरबाबत खूपच बोलत असते. काही दिवसांपूर्वी जान्हवीने 'शिकू' नावाचा नेकलेस घातला होता, आता जान्हवीने शिखरच्या नावाचा टी-शर्ट घातला असून, त्यावर त्याचा फोटो असल्याचे दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटो हा नाशिकमधील एका हॉटेलचा असून, जान्हवी ही एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तेथे गेली होती.
या सिनेमात वरुण धवनही झळकणार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये वरुण आणि ती दिसत असून, यामध्ये नाशिकमधील हॉटेलचे कर्मचारी दिसत आहेत. जान्हवी आणि वरुण है त्यांचा आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी नाशिकमध्ये गेले होते. पण, या फोटोमध्ये सर्वाधिक लक्ष वेधले ते म्हणजे जान्हवीने घातलेल्या टी- शर्टने. या खास टी- शर्टवर तिच्या प्रियकर शिखरचे नाव आणि त्याचा फोटो छापला केला होता. जान्हवीने यापूर्वीही तिचा प्रियकर शिखरसाठी तिचे प्रेम व्यक्त केले आहे.