Jahnavi Killekar  Instagram
मनोरंजन

Jahnavi Killekar | कुणी तरी येणार येणार गं..सुरज-संजना डोहाळे जेवण; जान्हवीने निभावलं अतुट नातं, व्हिडिओ व्हायरल

Jahnavi Killekar | कुणी तरी येणार येणार गं..सुरज-संजना डोहाळे जेवण; जान्हवीने निभावलं अतुट नातं, व्हिडिओ व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

सूरज आणि संजनाच्या डोहाळे जेवणाचा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या आनंदाच्या क्षणी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने खास उपस्थिती लावत त्यांच्या कुटुंबासोबत आनंद साजरा केला. ‘कुणी तरी येणार येणार गं...’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर शेअर झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून चाहत्यांनी जान्हवीच्या या जिव्हाळ्याच्या नात्याचे कौतुक केले आहे.

मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने संजना आणि सुरज चव्हाणचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ डोहाळे जेवणाचा असून जान्हवी सुरजची पत्नी संजनाची ओटी भरताना दिसतेय.

संजनाचे डोहाळे जेवण.... अशी कॅप्शन देत जान्हवीने दोन वेगवेगळे व्हिडिओ इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा आनंदसोहळा उत्साहात पार पडला.

आई-बाबा होण्याच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सूरज आणि संजनासाठी हा सोहळा अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय ठरला. पारंपरिक पद्धतीने सजवण्यात आलेल्या या कार्यक्रमात कुटुंबीयांसह मित्रपरिवारानेही आनंद व्यक्त केला. यावेळी जान्हवी किल्लेकरने उपस्थित राहून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सोहळ्यातील काही सुंदर क्षण पाहायला मिळतात. कार्यक्रमातील सजावट, उत्साही वातावरणात जान्हवी किल्लेकरने सुरजशी असलेले आपले नाते जपले. सूरज-संजना यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

जान्हवी किल्लेकरची उपस्थिती या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरली. तिच्या साध्या आणि आपुलकीच्या वागण्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमातील काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याच व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय जान्हवीच्या फॅन्सनी तिचे भरभरून कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT