Jana Nayagan Release Date out pudhari photo
मनोरंजन

Jana Nayagan Release Date Fix : विजय यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'जन नायकन'च्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा

विजय यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'जन नायकन'च्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा

स्वालिया न. शिकलगार

थलपथी विजयच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जना नायकन' या तारखेला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. नवीन पोस्टरसह रिलीज डेट जाहीर होताच सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे. विजयच्या दमदार लूकमुळे आणि चित्रपटाबद्दलच्या चर्चांमुळे 'जना नायकन'कडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

साऊथ सुपरस्टार थलपथी विजय यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विजय यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'जन नायकन' (Jana Nayagan) कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृतपणे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून हा चित्रपट कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार आहे, हे सांगितले आहे.

निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्टर शेअर करत ही घोषणा केली. या पोस्टरमध्ये थलपथी विजय त्यांच्या दमदार आणि आकर्षक अंदाजात दिसत आहे. विजय यांचा लूक यापूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. आता रिलीज डेट समोर आल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

'जन नायकन' हा सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या तमिळ चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर चाहत्यांचे लक्ष लागले होते. विशेषतः विजय यांच्या मोठ्या चाहता वर्गामुळे या चित्रपटाकडे केवळ तमिळ प्रेक्षकच नाही, तर देशभरातील सिनेप्रेमींचे लक्ष वेधले गेले आहे.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल, असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. हा चित्रपट आता २३ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

विजयचा देशभर मोठा चाहतावर्ग

थलपथी विजयची लोकप्रियता केवळ दक्षिण भारतापुरती मर्यादित नाही. हिंदी प्रेक्षकांमध्येही त्याची मोठी फॅन फॉलोईंग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT